Header AD

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी कल्याण पूर्वेत होम हवन
कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन त्यांना  दीर्घायुष्य लाभावे यासाठी कल्याण पूर्वेत नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वतीने साईयाग होम हवन करण्यात आले.


कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून नागरिकांना आरोग्य सुविधा आणि इतर जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे दिवसरात्र कार्यरत आहेत. अशातच जनतेची सेवा करतांना एकनाथ शिंदे कोरोना बाधित झाले आहेत. सामान्य नागरिकांसाठी झटणाऱ्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्यानेत्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी या साईयाग होमहवनाचे आयोजन केले असल्याची माहिती नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली.
यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, कल्याण पूर्व सहसंपर्क प्रमुख  शरद पाटील, माजी नगरसेवक शरद पावशे, विभागप्रमुख सुभाष गायकवाड प्रशांत बोटे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी कल्याण पूर्वेत होम हवन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी कल्याण पूर्वेत होम हवन Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads