Header AD

सुसंवादातून कोरोनावर मात वुई,आर,फॉर,यु,या अभियाना अंतर्गत " किरण नाक्ती टीम यांचे कोरोना काऊंन्सिलिंग
ठाणे  |  प्रतिनिधी  : - 
 सुसंवाद नेहमीच सकारात्मक बदल घडवत असतो.  आजही कोरोनाच्या या संवाद खुंटत असलेल्या  काळात एकमेकांसोबत सुसंवाद अतिशय महत्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा ठरू शकतो. याच उद्देशाने आदित्य प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेतर्फे किरण नाकती यांच्या संकल्पनेतून वुई आर फॉर यु We are for you या अभियानाअंतर्गत "कोरोना काऊंन्सिलिंग" या सेवेच्या माध्यमातून आजवर पाचशेच्या वर कोरोनाबधित रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना काऊंन्सिलिंग करण्यात आले.त्याचा परिणाम त्यांचा आत्मविश्वास वाढला व मानसिकरित्या कोरोनावर मात करण्यासाठी याचा खुप मोठा फायदा प्रत्येकाला होताना दिसला. कोरोना रूग्णांच्या होमक्वारंटाईन असलेल्या नातेवाईकांना जीवनावश्यक वस्तु घरपोच नेऊन देण्याची सेवासुद्धा दिली जाते. त्यामुळे आपण कुणी  या सेवेअंतर्गत ठाण्यातील विविध कोव्हिड रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती घेऊन त्यांचा व त्यांच्या नातेवाईकांचा मानसिकरीत्या आत्मविश्वास वाढविण्याचे काम करण्यात येते. 


सलग सहा महिने या कोरोनाकाळात आदित्य प्रतिष्ठान,ठाणेचे वुई आर फॉर यु हे ज्येष्ठ नागरिक व गरजूंना सेवा देण्याचे कार्य किरण नाकती व त्यांच्या सेवेकर्‍यांच्या माध्यमातून सुरू आहे. या अभियानाअंतर्गत अनेक सेवा देण्यात येत आहेत. त्यापैकी कोरोना काऊंन्सिलिंग हि एक अतिशय महत्वाची सेवा असून अनेक मनाने खचलेल्या कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नवसंजीवनी मिळत आहे.  सध्या ठाण्यात तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक ज्येष्ठ नागरिक व मनाने कमजोर असणार्‍या कोरोना रुग्णांना वैद्यकिय उपचारांसोबत मानसिक आधाराची गरज आहे, अशावेळी हि सेवा वरदान ठरत आहे.


तसेच हि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे.शारिरीक कोरोनाचे औषधरूपी उपचार देण्याचे सर्वच हॉस्पिटलमध्ये प्रयत्न सुरू आहेतच परंतु त्याचप्रमाणे मानसिक कोरोना घालवण्यासाठी वुई आर फॉर यु च्या कोरोना काऊंन्सिलिंग सारख्या सेवेची नितांत गरज आहे.

 

◆ पहा काय आहेत प्रतिक्रिया सेवा घेतलेला अनुभव

मी माधुरी जाधव ,  कोविड  पॉझिटिव्ह येणें माझ्यासाठी धक्कादायक बाब होती.... भयंकर ताप आणि डोकेदुखीने मी शारिरीक आणि मानसिक रित्या अगदी कोलमडून पडलेले.... माझी मनःस्थिती अगदी अगदी डळमळीत झालेली.मला कोरोना झाला हे माझे स्नेही शेखरदादा सोनार यांना कळताच , त्यांनी ही गोष्ट श्री किरण नाकती सरांना कळवली. माझ्यासारख्या अपरिचित  मुलीला त्यांच्यासारख्या सुप्रसिद्ध व्यक्तीने  स्वतः हून कॉल केला .... अतिशय प्रांजळपणे  आणि काळजीने माझी विचारपूस केली. अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या त्यांच्या शब्दांनी  मला खूप धीर आला, ते पुन्हा पुन्हा मला म्हणत होते  " तू फायटर आहेस. कोरोना वगैरे काहीच नाही मी आहे तुझ्यासोबत , कधी ही काही ही  वाटलं तर मला कॉल कर अथवा मिस्ड कॉल दे मी आहे., तिथली व्यवस्था नीट नसेल तर मला कळव , तू दोन दिवसात बरी होशील ( आणि तसंच झालं )  घरी गेल्यावर ही कशाची गरज भासली तर सांगा" 

त्यांच्या प्रत्येक शब्दांत किती आपलेपणा होता, जणू काही ते मला खूप आधी पासून ओळखत आहेत. मी जेव्हा social media वर त्यांच्याविषयी माहिती पाहायला लागले तेव्हा मात्र भारावून गेले , 

कोरोना काळात आमचे सख्खे शेजारी ही आमच्या सोबत परकेपणाने वागत असताना माझ्याशी दूर दूर ही ओळख नसलेले  नाकती सर अगदी आपलेसे वाटले. कोरोना कौन्सिलिंगच्या माध्यमातून किरण नाकती सरांनी केलेल्या या अप्रत्यक्ष मदतीला कायम स्मरणात ठेवेन. - माधुरी जाधव, ठाणे 

चला तर मग " वुई आर फॉर यु ला साथ देऊ या, कोरोनावर मात करू या."कोरोना काऊंन्सिलिंग सेवा : ९८१९१२९२७७  किरण नाकती व We are for you Team

सुसंवादातून कोरोनावर मात वुई,आर,फॉर,यु,या अभियाना अंतर्गत " किरण नाक्ती टीम यांचे कोरोना काऊंन्सिलिंग सुसंवादातून कोरोनावर मात वुई,आर,फॉर,यु,या अभियाना अंतर्गत " किरण नाक्ती टीम यांचे कोरोना काऊंन्सिलिंग Reviewed by News1 Marathi on September 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads