Header AD

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह संपन्न


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्ह्यात महिला जिल्हा अध्यक्षा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या पुढाकाराने विविध ठिकाणी महिला मोर्चाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले,  ७० दिवे लावून नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.सेवा सप्ताहा अंतर्गत स्वच्छता मोहीम विविध ठिकाणी राबविण्यात आलीकोरोनावर मात करून आलेल्या रुग्णांना रोपे व फळे वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना फळे वाटप करण्यात आले. गरजूंना धान्यमास्क आर्सेनिक ३० या गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. महिला मोर्चाच्या वतीने रक्तदान करण्यात आले. तसेच नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. या वाढदिवसाच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला सेवा सप्ताह नागरिकांसाठी उपयुक्त ठरला असून बहुसंख्य नागरिकांनी यात सहभागही नोंदवला असल्याची माहिती महिला जिल्हा अध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिली.

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह संपन्न भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह संपन्न Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे सोने व क्रूडच्या दरांना आधार

मुंबई, ३ डिसेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्यामुळे पिवळा धातू आणि कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. मात्र बेस मेटलचे दर घसरले. को...

Post AD

home ads