Header AD

क्या हुआ तेरा वादा! मालमत्ता करमाफीवरून भाजपाने करुन दिली शिवसेनेला आठवण


ठाणे  | प्रतिनिधी  : ठाणेकरांना ५०० चौरस फूटापर्यंत घराचा मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या वेळी घोषणेची, भाजपाने बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला आठवण करुन दिली आहे. शहरातील विविध भागात भाजपाने `क्या हुआ तेरा वादा' असा बॅनरद्वारे सवाल करीत मालमत्ता करमाफीवरून शिवसेनेने सुरू केलेल्या टाळाटाळीकडे ठाणेकरांचे लक्ष वेधले आहे. या बॅनरचे ठाण्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.


कोरोनाच्या आपत्तीत सापडलेल्या लाखो ठाणेकर कुटूंबांना मालमत्ता कर व पाणीपट्टीतून दिलासा देण्यास ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नकार दिला आहे. महापालिकेचे उत्पन्न घटणार असल्याचे कारण दाखवून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात ५०० चौरस फूटांपर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आता सत्ता मिळाल्यानंतर वचननाम्याचा सोयिस्कर विसर पडून मालमत्ता कर माफ करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, याकडे भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.

ठाणे शहरातील विविध भागात व बसथांब्यांच्या ठिकाणावर भाजपाने लावलेल्या `क्या हुआ तेरा वादा' बॅनरची आज सकाळपासून नागरिकांमध्ये व सोशल मिडियात चर्चेचा विषय ठरली. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात मालमत्ता कर व पाणीपट्टीत दिलासा मिळायलाच हवा, असे मत व्यक्त करीत बहूसंख्य नागरिकांनी भाजपाच्या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
क्या हुआ तेरा वादा! मालमत्ता करमाफीवरून भाजपाने करुन दिली शिवसेनेला आठवण क्या हुआ तेरा वादा! मालमत्ता करमाफीवरून भाजपाने करुन दिली शिवसेनेला आठवण Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads