Header AD

एन.आर.सी. कामगारांना थकीत १३०० कोटी मिळण्याबाबत कामगार आग्रही


 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  गेल्या ११ वर्षांपासून बंद असलेल्या एनआरसी या नामंकित कारखान्यातील कामगारांना कंपनीच्या वतीने थकीत देणी म्हणून १०० कोटी देण्यात येत असून मात्र हक्काचे थकीत १३०० कोटी देणी मिळण्याबाबत आयटक या युनियनशी सलंग्न असलेली ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अँण्ड जनरल वर्कस युनियन ठाम आहे. याबाबत संघटनेच्यावतीने शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.  


आशिया खंडातील रेयॉन उत्पादनात अग्रेसर असलेली  एन.आर.सी. कंपनी नोव्हेंबर २००९ पासुन बंद पडली आणि कारखान्यात काम करणारे कायम, हंगामीकंत्राटी कामगार रोजगार बंद झाल्याने देशोधडीला लागले.  कामगारांची हक्काची थकित देणी प्रकरणी आँल इडिया इन्डस्टिरयल अँन्ड जनरल वर्कस युनियन याबाबत मुंबई उच्च न्यायालय, ठाणे येथील औद्योगिक न्यायालयबीआरएफआरकामगार मंत्रालयएनसीएलटी तसेच दिल्लीत एनसीएलटी येथे गेली १० वर्षे लढा देत आहे.


कंपनीच्या मालकीच्या ४४२.५५ एकर जमीन, यंत्र सामुग्री, भंगार अशी मिळकतीची सुमारे ६ हजार कोटी रक्कम होत आहे. असे असताना बेरोजगार व देशोधडीला लागेल्या एनआरसी कामगारांची हक्काची प्राव्हीडंट फंडपेन्शन, ग्राज्युटी या हक्काच्या देण्यापासून वंचित ठेवत नाममात्र रक्कम देऊन बेदखल करण्याचा डाव एनआरसी कंपनीरहेजा बिल्डरचा असुन या विरुद्ध आमची लढाई असल्याचे  आँल इडिया इन्डस्टिरयल जनरल वर्कर युनियनचे सचिव कॉम. उदय चौधरी यांनी कल्याणातील पत्रकार परिषदे मध्ये सांगितले.


तसेच सुमारे चार हजार कामगाराची हक्काची थकीत देणी सुमारे १३००० कोटी इतकी होत असुन कंपनी फक्त १०० कोटी रक्कम देत असल्याने आम्हाला याबाबत दाद मागावी लागत असुन लाँकडाऊनमिशेन बिगेनअंतर्गत कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन नियमामुळे मोर्चा आंदोलने करु शकत नसल्याची खंत उदय चौधरी यांनी व्यक्त केली असून याबाबत शासनाने कामगारांच्या या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

एन.आर.सी. कामगारांना थकीत १३०० कोटी मिळण्याबाबत कामगार आग्रही एन.आर.सी. कामगारांना थकीत १३०० कोटी मिळण्याबाबत कामगार आग्रही Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads