Header AD

८७ व्या वर्षी सुलोचना साळवी यांची कोरोनावर मात


 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते याचे उदाहरण कल्याण मध्ये पाहायला मिळाले. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यात अनेक जण आले असून अशाच प्रकारे कोरोनाची लागण झालेल्या कल्याणमधील ८७ वर्षीय सुलोचना साळवी यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर डायबेटीज आणि बायपास शस्त्रक्रिया झालेली असतांना देखील यशस्वीरीत्या मात केली आहे.  

शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांना १४ ऑगस्ट रोजी त्रास जाणवू लागल्याने त्यांना कल्याण मधील मीरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले.  त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी त्यांच्या आई सुलोचना साळवी यांना  देखील असाच त्रास जाणवू लागल्याने त्यांना देखील या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.  सुलोचना साळवी यांना मधुमेह व उच्चरक्तदाब तसेच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. असे असतांना देखील २५ दिवस औषधोपचार घेऊन  इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.  

दरम्यान डॉ. गौतम गणवीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नाने आपले व आपल्या आईचे प्राण वाचले असून डॉ. गणवीर हे आमच्यासाठी देवदूत ठरले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांनी दिली असून. त्यांनी डॉ. गणवीर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आणि सर्व हितचिंतकांचे  आभार व्यक्त केले आहेत.

८७ व्या वर्षी सुलोचना साळवी यांची कोरोनावर मात ८७ व्या वर्षी सुलोचना साळवी यांची कोरोनावर मात Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads