Header AD

ठाण्याच्या इतिहासाचा साक्षिदार आणि परखड पत्रकार अखेर काळाच्या पडद्याआड गेला !ठाणे  :  अत्यंत धक्कादायक, दुःखद आणि वेदनादायक बातमी घेऊन अखेर आजचा दिवस उजाडला आणि ठाण्यातील चारित्र्यवान  पत्रकारितेच्या क्षेत्रात अंधक्कार करून गेला ! आयुष्यात कुटुंबातील दोन मोठ्या दुःखद आणि धक्कादायक प्रसंगांचा  सामना करूनही ताठ मानेने आणि वयाच्या 82 व्या वर्षातही एखाद्या तरुणाला लाजवेल आशा उत्साहात व धैर्याने जीवन जगणारे जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर , या दुर्दैवी आजारावर नक्की मात करून घरी परत येतील याची  रोज खात्री वाटत होती. प्रकृतीत किंचित सुधारणा होतेय अशी सुखद बातमी रोज कळत होती .पण दुर्दैवाने या महामारीने आणि मेंदूला मार लागल्याने एका  सत्शील पत्रकाराचा आज अखेर अंत झाला आणि प्रचंड धक्का बसला ! ठाण्याच्या इतिहासाचा एक चालता बोलता साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला ...

1984ला  माझी पत्रकारिता सुरू झाली, त्या दिवसा पासून  आज पर्यंत गेल्या 36 वर्षांच्या प्रवासातील नेर्लेकर गुरुजी माझे जेष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक होते.त्यावेळच्या  ठाण्यातील मोजक्या 10 ते 12 पत्रकारांच्या मांदियाळीतील ते एक प्रमुख शिरोमणी होते. सत्शील, प्रामाणिक , प्रेमळ , अत्यन्त संयमी , निष्प्रह , परखड , स्वच्छचारित्र्या चा पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. दरारा होता .साधा , सरळ स्वभाव असलेले नर्लेकर म्हणजे , उथळ पत्रकारिता कशी करू नये याचे ते मूर्तिमंत  उदाहरण असावे ! 

नेर्लेकर, तुम्ही नक्की बरे होणार अशी खात्री वाटत असतानाच आज अचानक आम्हाला आणि चारित्र्य सम्पन्न  पत्रकारितेला पोरके करून निघून गेलात ... तुमच्या सोबत  पत्रकारितेत आलेल्या अनेक सुखद अनुभवांची शिदोरी  आणि आठवणी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हृदयाच्या कप्प्यात कायम जिवंत राहतील ...जमल्यास आणि खरोखरच पुढचा जन्म असेल तर पुन्हा परत या आमच्या साठी ... !तो पर्यंत तुम्हाला माझी भावपूर्ण आदरांजली !🙏🙏
सोपान बोंगाणे
ठाण्याच्या इतिहासाचा साक्षिदार आणि परखड पत्रकार अखेर काळाच्या पडद्याआड गेला ! ठाण्याच्या इतिहासाचा साक्षिदार आणि परखड पत्रकार अखेर काळाच्या पडद्याआड गेला ! Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads