Header AD

विटाव्यातील डीपी बॉक्स ठरतोय धोकादायक


 

कळवा  |  अशोक घाग  :  विटावा विभागात वीज वितरण करणारा डीपी बॉक्स सध्या उखडलेल्या अवस्थेत असून तो ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी धोकायादक ठरतो आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या धर्तीवर या परिसरात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  विटावा वाहतूक पोलीस चौकीसमोर असलेल्या पदपथाजवळ असणारा वीज वितरण करणारा हा डीपी बॉक्स पदपथाच्या बाजूलाच आहे. तो सध्या उखडलेला असून काहीसा उघडा झाला आहे. या अवस्थेत त्यातील केबल्सही बाहेर आलेल्या दिसत आहेत. सध्या पावासाचे दिवस असल्याने पाणी साचून त्या केबल्समधून शॉर्टसर्किट होण्याचा धोका येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

 याबाबत विद्युत मंडळाकडे तक्रार दाखल करूनही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तरी संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी हा डीपी बॉक्स त्वरित व्यवस्थित उभा करून तो बंदिस्त करावा अशी म़ागणी स्थानिकांनी केली आहे.  
विटाव्यातील डीपी बॉक्स ठरतोय धोकादायक विटाव्यातील डीपी बॉक्स ठरतोय धोकादायक Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads