कोपरीवासीयांच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोनातून बरे व्हावे यासाठी महामृत्युंजय मंत्रजाप व होमहवन
ठाणे | प्रतिनिधी : जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहणारे गोरगरिबांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन पुनश्च एकवार जनसेवेत सक्रिय कार्यरत व्हावेत यासाठी कोपरी परिसरातील रहिवाशी तसेच समस्त ठाणेकर नागरिकांच्या आणि ,कोपरी व्यापारी वर्ग, सिंधी समाज व समस्त शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीत कोपरी येथील परम जागृत "शिव मंदिर"येथे बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळ पासून ११,००० हजार अखंडित महामृत्युंजय मंत्रजाप ,होमहवन व पूज्य बहराणा साहिब च्या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेविका नम्रता पमनानी, कोपरी पाचपाखडी विधानसभा उपयुवा अधिकारी हेमंत पमनानी यांच्या पुढाकाराने या प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment