Header AD

पारसिक नगरमधील नवरात्रौत्सव स्थगित करण्याचा गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांचा निर्णय


ठाणे  | प्रतिनिधी  :  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा खारीगाव-पारसिक नगर येथील नवरात्रौत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 


दरवर्षी संघर्ष या संस्थेच्या वतीने पारसिक नगर येथे मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच सण साजरे करण्यावर मर्यादा येत असल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला आहे. 


या संदर्भात त्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांमध्ये सर्वांना नवरात्रीचे वेध लागतील. आपण मतदारसंघात गेली 10 वर्षे  नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतो. दांडीया-गरबाही खेळला जातो. मात्र, यंदा तेथील नागरिकांनीच गरब्याचे आयोजन करु नका, अशी विनंती केली आहे. तसेच, देवीची प्रतिष्ठापणाही कोणाच्या तरी  घरी करण्यात यावी, असेही नागरिकांनी सुचविले आहे.  


या सुजाण नागरिकांच्या विनंतीचा मान ठेऊन यावेळी सार्वजनिक नवरात्रोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर वाढणारी रुग्णसंख्या पाहता सर्वांनी सावधगिरी पाळली पााहिजे. नवरात्रोत्सवात एकत्र भेटणे, दर्शनााला एकत्र येणे यामुळे पुढील दिवाळी धोक्यात येऊ शकते. एकंदरीत वाढती रुग्णसंख्या जरा चिंताजनक आहे. मृत्युदर घटला असला तरी रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करतात. त्यांनी या सर्व बाबींचा विचार करावा, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

पारसिक नगरमधील नवरात्रौत्सव स्थगित करण्याचा गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांचा निर्णय पारसिक नगरमधील नवरात्रौत्सव स्थगित करण्याचा गृहनिर्माण मंत्री    डॉ.आव्हाड यांचा निर्णय Reviewed by News1 Marathi on September 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads