Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा ३३८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू


◆ एकूण रुग्ण ४०,७५० तर ८०१ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या संख्येने ८०० चा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ३३८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४०,७५० झाली आहे. यामध्ये ४६७२ रुग्ण उपचार घेत असून ३५,२७७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३३८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३६कल्याण प  १०४डोंबिवली पूर्व ११९डोंबिवली प- ६७मांडा टिटवाळा  मोहना -१, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून१५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा ३३८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा  ३३८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !

डोंबिवली, शंकर जाधव  :  भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भ...

Post AD

home ads