Header AD

अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीची तोडक कारवाई

 


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  भिवंडी येथील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रशासनला खडबडून जाग आली असून पालिका क्षेत्रातील २८४ धोकादायक आणि १८७ अतिधोकादायक इमारतींची यादी नुकतीच जाहीर केली होती. यातील एका अतिधोकादायक इमारतीचा काही भाग पडल्याने हि इमारत पडण्याची कारवाई पालिकेने सुरु केली आहे.


 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण (प.) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोडवरील कृष्णा सिनेमाच्या आवारातील तळ मजला अधिक तीन मजले इमारत पाडण्याची कार्यवाही आज सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. हि इमारत अतिधोकादायक म्हणून जाहिर करण्यात आलेली आहे. या इमारतीत सद्यस्थितीत रहिवास नसून तळ मजल्यावर काही दुकानांचे गाळे आहेतया दुकानांचे गाळे रिकामे करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच अंतिम नोटीस बजावली होती.
तीन दिवसापूर्वी सदर इमारतीचा काही भाग पडल्याची तक्रार महापालिकेच्या आपत्कालिन कक्षाकडे प्राप्त होताच क प्रभागक्षेत्रातील अतिक्रमण विरोधी पथकाने, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशा नुसार बाजारपेठ पोलीस स्थानकातील पोलीस, १ पोकलेन१ जेसीबीच्या मदतीने हि इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. तत्पुर्वी तळमजल्यावरील सर्व दुकानांचे गाळे रिकामे करण्यात आले आहेत.


अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीची तोडक कारवाई अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीची तोडक कारवाई  Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एक हजार रिक्षांवर पाठींब्याचे पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

कल्याण , कुणाल म्हात्रे   :    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डों...

Post AD

home ads