Header AD

'कोरोना रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळण्यासाठी जागरूक नागरिक आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार'


◆  'कोवीड प्लाझ्मा ड्राईव्ह'मध्ये अधिकाधिक डोनर्सनी नोंदणी करण्याचे आवाहन

कल्याण | दि ७ | कुणाल म्हात्रे : कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी 'प्लाझ्मामहत्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर येत असले तरी संबंधित रुग्णांना वेळेवर 'प्लाझ्माउपलब्ध होणेही तितकेच महत्वाचे आहे. कोणताही वेळ न दडवता रुग्णाला आवश्यक त्याक्षणी प्लाझ्मा उपलब्ध व्हावा  याच विचारातून कल्याणमध्ये काही जागरूक नागरिक आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. या पुढाकरातूनच 'कोवीड प्लाझ्मा डोनेशन ड्राईव्ह'चे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले असून कोवीडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी यामध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

कोवीडमधून बऱ्या झालेल्या कल्याण डोंबिवलीतील व्यक्तींच्या नोंदणीचा विचार जागरूक नागरिक ॲड. जयदीप हजारे यांनी मांडला. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क केला. आताच्या घडीला अत्यावश्यक असणाऱ्या या कोवीड प्लाझ्मा ड्राईव्हबाबत डॉ.पाटील यांनीही विनाविलंब कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. ज्यावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमाला हिरवा कंदील दिला.

त्यानूसार 'कोवीड प्लाझ्मा ड्राइव्ह'ला नुकतीच सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये नोंदणीसाठी गुगलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन लिंक (गुगल लिंक :https://forms.gle/t3pBb6kTrZCj87b8A ) बनवण्यात आली आहे. यामध्ये नोंदणी करणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील इच्छुक प्लाझ्मा डोनर्सना कल्याणातील अर्पण आणि संकल्प ब्लडबँक तर डोंबिवलीतील प्लाझ्मा ब्लडबँकेमध्ये प्लाझ्मा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवलीतील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता कोवीडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी अधिकाधिक संख्येने या प्लाझ्मा ड्राईव्हमध्ये नाव नोंदवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीडॉ. प्रशांत पाटील आणि ॲड. जयदीप हजारे यांनी केले आहे. या प्लाझ्मा ड्राईव्हसाठी डॉ. इशा पानसरेडॉ. दिपक पोगाडेसीए मयूर जैनइट्स ऑल अबाऊट कल्याणचे चैतन्य देशमुख आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर 'लोकल न्यूज नेटवर्क-'एलएनएन'ही या उपक्रमात सहभागी झाले आहे.

गुगल लिंक 

https://forms.gle/t3pBb6kTrZCj87b8A

 :: 'कोवीड प्लाझ्मा ड्राईव्ह'बाबत अधिक माहितीसाठी संपर्क ::

कल्याण डोंबिवली महापालिका वॉर रूम - 0251-2211373

 डॉ. इशा पानसरे - 8976001949

ॲड.जयदीप हजारे - 9323042121 

'कोरोना रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळण्यासाठी जागरूक नागरिक आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार' 'कोरोना रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळण्यासाठी जागरूक नागरिक आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार' Reviewed by News1 Marathi on September 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads