Header AD

भिवंडी रोड रेल्वे स्थानकात पार्सल टर्मिनस, मालगाडी सुटणार खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश


भिवंडी, दि. ८ (प्रतिनिधी) : भिवंडी रोड रेल्वे स्थानकात पार्सल टर्मिनस सुरू झाले असून, भिवंडी तालुक्यातील व्यावसायिकांना देशातील विविध भागात मालगाडीद्वारे माल पाठविण्याचा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने टर्मिनस साकारले असून, भिवंडीकरांना वाहतूकीच्या कोंडीतूनही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

भिवंडी ही यंत्रमागनगरी असून, आशियातील सर्वात मोठी गोदामनगरी आहे. या ठिकाणी देशभरातील विविध भागात माल पाठविला जातो. रस्ते वाहतूकीपेक्षा रेल्वेचा मालवाहतुकीचा दर कमी आहे. मात्र, भिवंडी रोड रेल्वेस्थानकातून माल पाठविण्याची सुविधा नसल्यामुळे व्यापाऱ्यांना रस्तेमार्गाने जादा भाडे द्यावे लागत होते. त्याचबरोबर भिवंडीतील गोदामांमधून माल ने-आण करण्यासाठी येणाऱ्या जड-अवजड वाहनांमुळे भिवंडी, कल्याण, शीळफाटा आणि ठाणे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यात दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. मात्र, आता पार्सल टर्मिनसमुळे भिवंडीत येणाऱ्या जड-अवजड ट्रकची वाहतूक निश्चितच कमी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे भिवंडी रोड रेल्वे स्थानकात पार्सल टर्मिनस सुरू करण्याची विनंती केली होती. ती मान्य झाली असून, पार्सल टर्मिनसची सेवा सुरू झाली आहे. भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून भिवंडीतील विविध माल घेऊन पहिली मालगाडी रवाना होणार आहे.भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिकांबरोबरच लघु उद्योजकांना रेल्वेच्या माध्यमातून वेगाने माल पाठविता येईल. पार्सल टर्मिनसमुळे भिवंडीतील व्यावसायिकांना निश्चितच दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

भिवंडी रोड रेल्वे स्थानकात पार्सल टर्मिनस, मालगाडी सुटणार खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश भिवंडी रोड रेल्वे स्थानकात पार्सल टर्मिनस, मालगाडी सुटणार खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश Reviewed by News1 Marathi on September 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads