Header AD

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची भेट


मुंबई  | प्रतिनिधी  : -  मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर 24 तासाची नोटीस देऊन तोडक कारवाई केली आहे त्यामुळे त्यांनी नियमाचे उल्लंघन करून कंगणावर पालिकेने अन्याय केला  आहे .त्यामुळे  अभिनेत्री कंगना राणावत ला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कंगना च्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर  कारवाई करून तिला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना विनंती केली आहे. 

कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारने कोरोना साठी कठोर पावले उचलावी असे आदेश महामहिम भगतसिंग कोष्यरी यांनी राज्य सरकार ला  द्यावेत यासाठी निवेदन दिले आहे.

 कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते त्यांना मरणोत्तर  महाराष्ट्र् भूषण  पुरस्कार मिळाला पाहिजे याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे .

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची भेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली  महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची  भेट Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads