सायंकाळी७ नंतर दुकाने खुली दिसल्यास दंडात्मक कारवाई का ? मनसेची सोशल मिडीयावर प्रशासनावर टीका
डोंबिवली | शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली शहरात कोरोना बाधितांची संखा वाढत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी राज्य सरकार एकीकडे जोरदार प्रयत्न करत असताना दुसरीकडे केडीएमसी कोरोणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका हद्दीतील दुकाने सायंकाळी सात वाजल्यानंतर खुली दिसल्यास ५ हजार दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मनसेचे या कारवाईबाबत सोशल मिडीयावर प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी प्रशासनाची कारवाई चुकीची असल्याचे सांगितले.
कोरोना काळात सायंकाळी सात वाजल्यानंतर दुकाने खुली करण्यास मनाई आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र तरीही काही दुकानदार आदेशाची अंमलबजावणी करत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सायंकाळी ७ नंतर दुकाने खुली दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार अश्या दुकानदारांवर कारवाई सुरु झाली आहे.परंतु कारवाईत ५ हजार रुपये दंड आकारला जात असल्याने यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.
नियमांचे पालन सर्वांनी केले पाहिजे पण दंड वसुलीची रक्कम इतकी मोठी ठेवणे योग्य नाही असे मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत सोशल मिडीयावर मनसेने टीका केली आहे. कल्याण-डोंबिवलीत संध्याकाळी ७ नंतर कोरोना फिरतअसतो असे उपासात्मक लिहून मनसेने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृतीवर दिल्यास नागरीका स्वतः हून नियमांचे पालन करतील मात्र एवढीमोठी रक्कम दंड म्हणून वसूल केल्यास नागरीका प्रशासनावर नाराज होतील.

Post a Comment