Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार पार


◆ ८८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू ,१०८ एकूण रुग्ण तर ७१५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १८७ रुग्णांना डिस्चार्ज..…

 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ३४ हजारांचा आकडा पार केला आहे. आज नव्या ५८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७  जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

      आजच्या या ५८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,१०८ झाली आहे. यामध्ये ४९८१ रुग्ण उपचार घेत असून २८,४०४  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

       आजच्या ५८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ७५,  कल्याण प.- १६४डोंबिवली पूर्व १८४डोंबिवली प- ११५मांडा टिटवाळा – ३३मोहना – १२तर पिसवली येथील  रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून१ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार पार कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार पार  Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads