Header AD

मास्क न लावणा-याविरूद्ध पालिकेची कारवाई पहिल्या दिवशी केला ५८ हजाराचा दंड वसूल
ठाणे | प्रतिनिधी : विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तीविरूद्ध ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आज एकूण ११६ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रूपयांचा दंड वसूल केलामहापालिका आयुक्त डाॅविपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहेतसेच सार्वजनिक ठिकाणी,शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले आहेया पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅविपिन शर्मा यांनी कालच त्याबाबतचा आदेश काढला होता.आदेशाच्या पहिल्याच दिवशी महापालिका हद्दीमध्ये विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकूण ११६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीया कारवाईतंर्गत एकूण ५८ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला.यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये १४ हजार दंड वसूल करण्यात आलावर्तकनगरमधून ५५०० तर लोकमान्य

नगर सावरकर प्रभाग समितीमधून ४५०० दंड वसूल करण्यात आला.वागळे प्रभाग समितीमधून ३५००,नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत १६५०० तर कळवा प्रभाग समितीमधून ४००० एवढा दंड वसूल करण्यात आला.मुंब्रा प्रभाग समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण ४००० एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण ६००० एवढादंड वसूल करण्यात आला.दरम्यान दंडात्मक कारवाई करताना नागरिकांशी योग्य संवाद साधून त्यांच्यामध्ये मास्क वापरण्याचे महत्व समजून सांगावे अशा स्पष्ट महापालिका आयुक्त डाॅविपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.

मास्क न लावणा-याविरूद्ध पालिकेची कारवाई पहिल्या दिवशी केला ५८ हजाराचा दंड वसूल मास्क न लावणा-याविरूद्ध पालिकेची कारवाई पहिल्या दिवशी केला ५८ हजाराचा दंड वसूल Reviewed by News1 Marathi on September 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads