Header AD

पोलीस प्रशासना विरोधात खवा व्यापारी मागणार उच्च न्यायालयात दाद


◆ कल्याण शिवभिम मिठाई,खवा टूर्स,ट्रान्सपोर्ट चालक मालक कामगार संघटनेची वार्षिक बैठक संपन्न..

कल्याण  | कुणाल म्हात्रे   :  मिठाईसाठी लागणाऱ्या खव्याची वाहतूक करतांना पोलीस प्रशासनाकडून नाहक त्रास दिला जात असून खवा पकडल्यानंतर कोणतीही चाचणी न करता नकली खवा म्हणून घोषित करून खवा व्यापाऱ्यांची पोलीस प्रशासन नाहक बदनामी करत आहे. या विरोधात खवा व्यापारी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. कल्याण शिवभिम मिठाई, खवा टूर्स,ट्रान्सपोर्ट चालक मालक कामगार संघटनेची २१ वी वार्षिक बैठक नुकतीच पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बस, ट्रकरेल्वे माल लोडींग बाबत चर्चा झाली. पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाबद्दल उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला असून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या नेत्तृत्वाखाली महाराष्ट्र पोलिस महासंचालकांची भेट घेण्यात येणार आहे. वाहतुकी दरम्यान खवा पकडल्यानंतर अन्न व औषध विभागाचे अधिकारी येईपर्यत पकडलेल्या मालाची मोजणी करून सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी पोलिसांनी घ्यावी याबाबत देखील चर्चा झाली.

आमदार विश्वनाथ भोईर यांनी हा विषय पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविला असून यामध्ये लक्ष देण्याची मागणी केली आहे. आगामी दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये कशाप्रकारे व्यापार करावा, पोलिसांनी माल जमा केल्यास  रिटर्न ऑफ प्रॉपर्टी दावा दाखल करणे तसेच माल खराब झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा करणे, व्यापाऱ्यांचा माल हा कंपनी रजिस्टर लीगल माल असतांनाही पोलीसप्रशासन अन्न औषध प्रशासनाच्या अहवालाविना त्याला नकली सांगूनबदनामी करतात याबाबत न्यायालयात दावा करण्यात येणार आहे याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

  पार पडलेल्या या बैठकीत सागर पगारेप्रशांत धनावडेराजा जाधवपप्पू सिंहलखपत राजपूतपुरुषोत्तम खंडेलवालकेशव सिंहसेवाराम बघेलरमेश खंडेलवाल, केशव सिंह दाताराम राजपूतज्ञांसिंह बघेल आदी पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती संघटनेचे जनरल सेक्रटरी जयदीप सानप यांनी दिली.

 

पोलीस प्रशासना विरोधात खवा व्यापारी मागणार उच्च न्यायालयात दाद पोलीस प्रशासना विरोधात खवा व्यापारी मागणार उच्च न्यायालयात दाद Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads