Header AD

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यात ३०० किमी रस्त्यांसाठी प्रयत्न खासदार कपिल पाटील यांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडे


ठाणे  |  प्रतिनिधी  :  पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून विशेष बाब म्हणून ठाणे जिल्ह्यात अतिरिक्त ३०० किलोमीटर रस्त्याची लांबी वाढवून मिळण्यासाठी, भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांना साकडे घातले आहे. या संदर्भात मंत्री तोमर यांनीही सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.


ठाणे व पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला ६ वर्ष झाल्यानंतरही, तांत्रिक कारणांमुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत ठाणे व पालघर एकच जिल्हा धरुन रस्त्याची लांबी मिळत आहे. तसेच ठाणे जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता रस्त्याची लांबी ५ हजार किलोमीटर एवढी असून, पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला फक्त १०० किलोमीटर लांबीच आली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला दिलेली लांबी ही भौगोलिक रचनेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच महत्वपूर्ण रस्त्यांची कामे होऊ शकलेली नाहीत. 

या संदर्भात भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची काल मंगळवारी भेट घेतली. तसेच त्यांना ठाणे जिल्ह्यासाठी आणखी ३०० किलोमीटर रस्त्याची अतिरिक्त लांबी वाढवून देण्याची विनंती केली. त्यावर ग्रामविकास मंत्री तोमर यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यात ३०० किमी रस्त्यांसाठी प्रयत्न खासदार कपिल पाटील यांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यात ३०० किमी रस्त्यांसाठी प्रयत्न  खासदार कपिल पाटील यांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडे Reviewed by News1 Marathi on September 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads