Header AD

मशिदीवरील भोंगे काढण्याची भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी दिले पोलीस उपायुक्तांना पत्र


कल्याण  | कुणाल म्हात्रे : कल्याण शहरातील मशिदी वरील भोंग्यांच्या आवाजामुळे नागरीकांना त्रास होत असून नागरिकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल या मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

       कल्याण शहरातील काळी मशिदी जवळ राहणाऱ्या काही नागरिकांनी मशिदी वर असलेल्या लाऊड स्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे ते अतिशय त्रस्त झाले असून त्याचा परिसरातील सर्व नागरिकांना खूप त्रास होत असल्याची तक्रार रत्नपारखी यांच्याकडे केली होती. ह्या आवाजामुळे मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होतो तसेच घरात जर कोणी आजारी असेल तर त्या रुग्णास आराम मिळत नाही. गरोदर महिला असेल तर तिचा रक्तदाब वाढतो ज्याचा परिणाम म्हणून तिच्या पोटातील बाळास क्षती पोहचू शकते. लहान मूल झोपले असेल तर ते आवाजाने दचकून व घाबरून जागे होते. वरीष्ठ व्यक्तिंना आवाजाचा त्रास होऊन त्यांचे मानसिक स्वास्थ हरवले असून त्याचा  त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे जी अत्यंत चिंतेची बाब असल्याचे या तक्रारीत नमूद केलं आहे.  

  कल्याण शहरात पारनाकाबैल बाजार, सहजानंद चौक, सिंधी गेट इंदिरानगरभोईवाडा अशा बऱ्याच भागांमध्ये या मशिदी असूनया मशिदींवरील वरील लाऊड स्पीकरच्या आवाजाने निश्चितच  नागरिकांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतोय.  या मशिदींच्या परिसरात असलेल्या हॉस्पिटल किंवा मॅटर्निटी होम मधील रुग्णांच्या स्वास्थ्यावर  किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळावर या स्पिकरच्या आवाजाचा भयंकर वाईट परीणाम होत असतो. तसेच  या संदर्भातहायकोर्टाचे आदेश देखील आहेतच. धार्मिक तेढ निर्माण करणे किंवा कोणत्याही धर्माविरोधात बोलणे हा आपला हेतू नसून फक्त लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळणे हीच मनापासून निस्वार्थ इच्छा असल्याचे पुष्पा रत्नपारखी यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

भारत देशात  संविधानावर आधारित कायदे असूनते कायदे सर्वांसाठी समान आहेत.  या कायद्यास अनुसरूननमाज पढणे असो किंवा आजान देणे असो किंवा आणखी काही सोपस्कार असोत ते सगळे धार्मिक स्थळांच्या आत केले जावेत जेणेकरून त्या आवाजाचा लोकांना त्रास होता कामा नये. म्हणून समस्त कल्याण शहरातील नागरीकांच्या वतीने आपण यात वैयक्तिक लक्ष घालून मशिदीवरील भोंगे काढून टाकावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याची भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी दिले पोलीस उपायुक्तांना पत्र मशिदीवरील भोंगे काढण्याची भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी  पुष्पा रत्नपारखी यांनी दिले पोलीस उपायुक्तांना पत्र Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads