Header AD

भिवंडी महानगरपालिका आठ स्थायी समिती सदस्य निवृत्त, नवीन सदस्यांची निवड


 

भिवंडी  | प्रतिनिधी   :  भिवंडी महानगरपालिकेतील स्थायी समितीची रचना लक्षात घेता स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने या आठ सदस्यांच्या  निवृत्त झाल्याने नवीन सदस्यांच्या निवडी करता महासभेचे आयोजन पालिका सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पिठासिन अधिकारी म्हणून महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या अध्क्षतेखालील  व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झूम अॅपद्वारे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. 


महासभेच्या विषय पत्रिकेवरील विषय पारित करताना जुने आठ सदस्य ज्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला  असे आठ सदस्य निवृत्त झाले त्यामध्ये  मोहम्मद हलीम अन्सारी, विलास पाटील, अंजुम अहमद हुसैन सिद्दिकी, परवेज  अहमद सिराज अह.मोमीन, सिराज ताहीर मोमीन, वसीम अन्सारी,  बाळाराम चौधरी आणि मदन कृष्णा नाईक हे आठ सदस्य निवृत्त झाल्यामुळे या आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. 


यामध्ये नवीन सदस्यांमध्ये   कोणार्क विकास  आघाडीतर्फे विलास पाटील, भारतीय काँग्रेस पक्षातर्फे अरुण राऊत, मोहम्मद हलीम अन्सारी,आरिफ मोहम्मद हनीफ खान, प्रशांत अशोक लाड, डॉक्टर जुबेर अन्सारी, शिवसेनेतर्फे संजय म्हात्रे आणि वंदना मनोज काटेकर अशा नवीन आठ सदस्यांची निवड  महासभेत करण्यात आली. 


पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे पाच सदस्य शिवसेनेचे दोन आणि कोणार्क विकास आघाडीचे एक सदस्य नव्याने निवडून नव्याने निवडून आले आहेत. विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या कार्यालयात नोंदणीनुसार एकूण 16 स्थायी समितीची रचना लक्षात घेता शिवसेना दोन सदस्य,  भाजपा चार, कोणार्क  विकास आघाडी दोन आणि भारतीय काँग्रेस पक्ष 8 यांच्या  अशा एकूण सोळा सदस्यांची स्थायी समितीची रचना आहे.


स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीबाबत गटनेत्यांनी यांच्याकडं सीलबंद नाव घेण्यात आली. गटनेत्यांनी आयुक्त यांच्याकडे सीलबंद पाकिटात  केलेल्या  नावानुसार नवीन स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आल्याचे महापौर प्रतिभा पाटील यांनी महासभेत जाहीर केले.  सर्व  नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून महासभेचे कामकाज तहकूब केल्याचे महापौर प्रतिभा पाटील यांनी जाहीर केले.

भिवंडी महानगरपालिका आठ स्थायी समिती सदस्य निवृत्त, नवीन सदस्यांची निवड भिवंडी महानगरपालिका आठ स्थायी समिती सदस्य निवृत्त, नवीन सदस्यांची निवड Reviewed by News1 Marathi on September 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads