Header AD

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त भाजपाचे ठाण्यात विविध कार्यक्रम तृतीयपंथीयांसाठी आरोग्य शिबिर, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना इम्युनिटी व पीपीई किट वाटप


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ता भाजपाच्या वैद्यकिय आघाडीतर्फे वागळे इस्टेट येथील शिबिरात बोलताना आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे. सोबत विजयराव पुराणिक, आशिष शेलार व अन्य....


ठाणे  | प्रतिनिधी  :  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने ठाणे शहर जिल्हा भाजपातर्फे विविध कार्यक्रम पार पडले. भाजपा वैद्यकिय आघाडीतर्फे तृतीयपंथीयांसाठी मोफत आरोग्य शिबिर,  स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना इम्युनिटी किट व पीपीई किट. नाभिकांना पीपीई किट, रिक्षाचालक महिलांना स्टीमर आदींचे वाटप करण्यात आले. दरम्यान, तृतीयपंथीयांना कायमस्वरुपी उपचारांसाठी परिसरातील डॅाक्टरांबरोबर संपर्क साधून देण्यात आला.


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. भाजपाच्या खोपट येथील मुख्य कार्यालयात दीनदयाळजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी भाजपाचे आमदार आशिष शेलार, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, सचिव संदिप लेले आदी उपस्थित होते. पंडित दीनदयाळजींच्या विचारांचे स्मरण करीत नवा भारत घडविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. तर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज निवासस्थानी भाजपाचे झेंडे फडकाविले होते.


वागळे इस्टेट येथील केबीपी महाविद्यालयात तृतीयपंथीयांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० हून अधिक जणांची मोफत तपासणी करण्यात आली. किन्नरांवर कायमस्वरुपी उपचार करण्यासाठी भाजपातर्फे त्यांच्या घराजवळील डॅाक्टरांशी संपर्क साधून देण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर माफक दरात उपचार होऊ शकतील. या शिबिराला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव पुराणिक, आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, वैद्यकिय आघाडीचे राज्य संयोजक डॅा. अजित गोपछडे, डॅा. राहूल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. 


ठाणे शहरातील विविध स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना मोफत इम्युनिटी किट व पीपीई किटचे वाटप करण्यात आले. वागळे इस्टेट येथील जय भवानी नगर येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांची उपस्थिती होती. तर शहरातील अन्य स्मशानभूमीत भाजपा कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना किट वाटप केल्या. 


ठाणे शहरातील नाभिक समाजबांधवांनाही मोफत पीपीई किट वाटप केल्या गेल्या. तर भाजपाच्या वर्तकनगर मंडलातर्फे निलेश तिवरामकर यांनी महिला रिक्षाचालक व सफाई कर्मचाऱ्यांना स्टिमरचे वाटप केले. 
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त भाजपाचे ठाण्यात विविध कार्यक्रम तृतीयपंथीयांसाठी आरोग्य शिबिर, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना इम्युनिटी व पीपीई किट वाटप पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त भाजपाचे ठाण्यात विविध कार्यक्रम तृतीयपंथीयांसाठी आरोग्य शिबिर, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना इम्युनिटी व पीपीई किट वाटप Reviewed by News1 Marathi on September 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads