Header AD

बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन


ठाणे  |  प्रतिनिधी  :  
बेरोजगारी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करत "रोजगार द्या" अशी मागणी करत ठाण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.मोदी सरकार मोठ्या प्रमाणात जनतेची फसवणूक करत असून अनेकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाल्या आहे. कोरोना काळातही केंद्र सरकारकडून जनतेला कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार विरोधात करत युवक कॉंग्रेसच्या वतीने 'रोजगार दो' अशा घोषणा देत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. "मोदी सरकार रोजगार दो'च्या घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे,महाराष्ट्र प्रभारी हरपाल सिंह,महाराष्ट्र कोकण  विभाग प्रभारी व सचिव प्रदीप सिंघवी,महाराष्ट्र उपाध्यक्ष ब्रिजदत्त महाराष्टाचे प्रवक्ते अनंत सिंग,रिषिका राखा,ठाणे शहर काँगेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी,महिला अध्यक्ष शिल्पा सोनोने आदी सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी वाढत्या बेरोजगारीच्या समस्येकडे केंद्र सरकार सोयीस्कर डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारने युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या कामाकडे लक्ष द्यावे यासाठीचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .

कोरोनामुळे लोकडाऊन करण्यात आल्याने देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामुळे रोज करोडो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत मागील ७० दिवसात १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असे असताना मोदी सरकार सुशांत सिंग,कंगना राणावत यासारख्या मुद्द्यांना रोज पुढे आणून मुळ मुद्द्यांना बगल देत आहे. परंतु करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात लोक आत्महत्या करतात याबाबत मात्र मोदी सरकार काही बोलत नाही म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असल्याचे यावेळी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष  सत्यजित तांबे यांनी सांगितले केंद्र सरकार अशीच जनतेची फसवणूक करणार असेल, तर कॉंग्रेसला आक्रमक व्हाव लागेल.आज मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशात अराजकता माजली असून देशाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने तरुणांना रोजगार त्वरित उपलब्ध करावा, अन्यथा कॉंग्रेसला अजून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला आहे. 
बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन Reviewed by News1 Marathi on September 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads