कल्याण : ब्लाइंड कार्ड्स एन्टरटेन्मेंट प्रस्तुत अंतरंग इंटरनॅशनल पोईट्री फेस्टिवल-२०२० नुकताच आँनलाईन पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट निवडक पाच काव्यकलाकृतींना पारितोषिक रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रत्येकी सहा कवितांना स्पेशल रिकॉग्निशन देण्यात आले असून ब्लाइंड कार्ड्स एंटरटेनमेंट प्राइम रिकॉग्निशन अवाँर्ड देखील देण्यात आला. तसेच याव्यतिरीक्त सर्वच सहभागी कवींना काव्यप्रतिष्ठा प्रेरणा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक '२६/११ पराक्रमाची आज गरज आहे' (कवी संजय पालवे-पाटील, महाराष्ट्र,भारत) या कवितेला मिळाला असून, व्दितीय - 'जस्टीस फाँर आँल' (कवी केफास नंटप अँडम्स, नायजेरीया), तृतीय - 'यथार्थ' (कवी जयेश मकवाना, गुजरात, भारत), चतुर्थ- 'अँन इथिकल टेस्ट' (कवी अनुरेख फुकोन, आसाम, भारत) व पाचवा- 'व्हेअर द गाँड एक्झिट' (कवी डेनियल रिझवी, मध्यप्रदेश, भारत) या कवितांना मिळाला आहे. तसेच 'सोचता हूँ' (कवी नीरज नगर, मध्यप्रदेश, भारत) या कवितेची ब्लाइंड कार्ड्स स्पेशल रिकाँग्निशन करीता निवड करण्यात आली आहे. अंतरंग काव्यमहोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक सुराज कुटे व 'पाखर' या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या लघुचित्रपटाचे गीतकार व कवी गणराज मधू काव्यमहोत्सवाचे परीक्षक होते.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, छत्तीसगड, ओडिसा, मेघालय, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, यांसह संपूर्ण भारतातील विविध राज्यातून काव्यप्रेमींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच आंतरराष्ट्रीय पाताळीवरूनअमेरीका, फिलिपिन्स, नायजेरिया, आफ्रिका, पाकिस्तान, व इतर अनेक देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.
Post a Comment