Header AD

कल्याण डोंबिवलीत ४६३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


◆एकूण रुग्ण  ,९३१  तर ७८५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५४४ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४६३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या ४६३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,९३१ झाली आहे. यामध्ये ४७७३ रुग्ण उपचार घेत असून ३४,३७३  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४६३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५७कल्याण प  १४१डोंबिवली पूर्व १५१डोंबिवली प- १०२मांडा टिटवाळा मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून२ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ४६३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ४६३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads