Header AD

भिवंडीत रस्ता दुरुस्तीसाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाला मनसेचा खळखट्याकचा ईशारा !भिवंडी |  प्रतिनिधी  :  ठाणे ,भिवंडी ,कल्याण शहरातील वाढती वाहतूक समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने ठाण्याहून भिवंडी कल्याणसाठी मेट्रो प्रकल्प - ५ च्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे.ठाणे ते भिवंडी मार्गावर मेट्रो मार्गासाठी पिल्लर खोदाईचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे.मात्र मेट्रोचे काम सुरू असताना कशेळी ते अंजूरफाटा दरम्यान मेट्रो प्रशासनाने रोजच्या वाहनांची ये - जा सुरळीत होण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करून वाहतूकीस अडथळा निर्माण केला आहे.या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत.त्यामुळे सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने मेट्रो व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी.के.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सचिव संजय पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी जिल्हा अध्यक्ष भारत लक्ष्मण पाटील,तालुकाध्यक्ष शिवनाथ भगत , वाहतूक शाखा तालुकाध्यक्ष संतोष  म्हात्रे,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष परेश चौधरी, तालुका संघटक  संतोष पाटील , मनोज म्हात्रे , हनुमान वारघडे , मिलिंद तरे ,समन्वयक मनोज प्रजापती,कुलेश तरे,साईनाथ पाटील आदींसह मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मेट्रो प्रकल्प - ५ च्या व्यवस्थापकांना निवेदन सादर करून रस्ता आठ दिवसांत दुरुस्त करा नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा ईशारा दिला आहे.
भिवंडीत रस्ता दुरुस्तीसाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाला मनसेचा खळखट्याकचा ईशारा ! भिवंडीत रस्ता दुरुस्तीसाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाला मनसेचा खळखट्याकचा ईशारा ! Reviewed by News1 Marathi on September 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads