Header AD

बाबासाहेब कांबळे यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई  |  प्रतिनिधी  :-   सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे ग्रामीण जनतेची सेवा करणारे; ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविणारे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत बाबासाहेब कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली  अर्पण केली आहे.

दिवंगत बाबासाहेब कांबळे हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा गावचे रहिवासी होते.भारतीय दलित पँथर पासून माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते होते. ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्यासाठी पोलीस ; झेड पी; बी डी ओ आदी कार्यालयात जनतेची गाऱ्हाणी मांडून ती सोडविणारा नेता बाबासाहेब कांबळे होते. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगली मध्ये रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत त्यांनी केले. बाबासाहेब कांबळे यांच्या सारखे  अत्यंत प्रामाणिक; विश्वासू एकनिष्ठ कार्यकर्ते दुर्लभ असतात. त्यांचे  काल अचानक हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रामाणिक कार्यकर्तृत्वाचा भीमसैनिक हरपला असून सांगली जिल्ह्याचीही मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 
बाबासाहेब कांबळे यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले बाबासाहेब कांबळे यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads