सातनंतर उघड्या आस्थापनांवर महापालिकेची धडक कारवाई आयुक्तांच्या आदेशानंतर सहा - आयुक्तांची कारवाई
◆ महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समित्यांमध्ये धडक कारवाई केली..
ठाणे | प्रतिनिधी : सातनंतर उघड्या राहणा-या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज सायंकाळी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई केली.
सायंकाळी सातनंतर अनेक आस्थापना सुरू असल्याच्या तक्रारी तसेच काही ठिकाणी अन्न पदार्थांचे स्टाॅलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज सायंकाळच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना प्रभागामध्ये फिरण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सर्व आयुक्तांनी आज आपापल्या प्रभागामध्ये फिरून सातनंतर उघडी असलेली दुकाने सील करण्याची धडक कारवाई केली.

Post a Comment