Header AD

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वैद्यकीय तपासणी शिबीर



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहरच्या वतीने  अमर ज्योती प्रतिष्ठान, हेल्थकेअर आणि आय केअर सेंटर यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन इंदिरानगर येथे रविवारी करण्यात आले होते.


       प्रभाग क्रं. ७३ इंदिरा नगर येथे राजीव नगर, त्रिमूर्ती नगर, शिवशंकर नगर, गौरी शंकरवाडी या परिसरातील नागरिकांची मधुमेह, बी.एम.आय. बॉडीफॅड, रक्तदाब, नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण, आहार सल्ला, डोळे तपासणी, मोतीबिंदू तपासणी, सर्दी, खोकला, ताप आदींची मोफत तपसणी करण्यात आली. तसेच नागरिकांना मोफत औषधे देखील देण्यात आली. त्याचप्रमाणे संपूर्ण बॉडी स्कॅनिंग, मशीनद्वारे ब्लड टेस्ट व अल्पदरात चष्मे देखील देण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


       या शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके, जिल्हा संघटक मिलिंद साळवे, गौतम सुतार, रेखा कुरवारे, रविकिरण मस्के, अशोक गायकवाड, बाजीराव माने, विजय इंगोले आदींनी केले होते.        

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वैद्यकीय तपासणी शिबीर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वैद्यकीय तपासणी शिबीर Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads