Header AD

आर्थिक गर्तेत सापडलेल्या वाहक व चालकांची सावकाराकडून लूट कल्याण एसटी डेपोतील मुजोर सावकार अखेर निलंबित


कल्याण |  कुणाल म्हात्रे  
: कल्याण एसटी आगारातील एका वाहकाने गेल्या अनेक वर्षा पासून बेकायदेशीर पणे सावकारी सुरू केली असून कल्याण आगारातील गोर गरीब वाहक व चालक कर्मचाऱयांना  अनधिकृतरित्या व्याजाने पैसे देऊन त्याच्या कडून अव्वाच्या सव्वा चक्रवाढ व्याज लावून कर्मचाऱयांना दमदाटी करून पैसे वसूल करीत असल्याने सावकारीच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱयांनी सावकाराच्या मनमानी कारभारा बाबत पोलीस ठाण्यात व राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या कडे तक्रार केली होती. या तक्रारीची एसटी ठाणे विभागीय कार्यालयाने दाखल घेत मुजोर सावकार परिवहन वाहक हरीष नाहीदे याला  निलंबित करून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

     कल्याण एसटी आगारात गेल्या १० ते १५ वर्षा पासून आगारात कार्यरत असलेला वाहक हरिष नाहीदे हा डेपोतील आर्थिक टंचाईने कर्जाच्या ओझ्या खाली दबलेल्या वाहक व चालक कर्मचाऱयांना व्याजाने पैसे देतो.  व्याजाने दिलेल्या पैशांवर पठाणी व्याज लावून दमबाजी करून दामदुपट्टीने पैसे वसूल करीत आहे. परिवहन आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा आशीर्वादाने सावकाराचा बेकायदेशीर धंदा कल्याण आगारात राजरोपणे सुरू असल्याने त्याची कामगार वर्गात चांगलीच दहशत बसलेली आहे.

कल्याण आगारातील वाहक व चालक व अन्य कर्मचारी महिना अखेरीस किंवा गरजेच्या वेळी पैशाची चणचण भासत असल्याने एक- दोन हजार रुपये किंवा त्या पेक्षाही अधिक रुपये नाहीदे यांच्या कडून व्याजाने घेत असतात. शेकडा दहा टक्क्यांचे व्याज आकारून पैसे देण्याचा बेकायदेशीर धंदा आगारातच सुरू केलेला असल्याने अनेक गरजवंत कामगार सावकारी पाश्याला बळी पडलेले आहेत. आगारातील कर्मचारी रामचंद्र दगडखैरे यांनी जानेवारी महिन्यात आगारातील सावकार हरिष नाहीदे यांच्याकडून वीस हजार रुपये व्याजी घेतले होते. व्याजी घेतलेले पैशाचे व्याज कधी रोखीने व  गुगल- पे ने  देऊन त्या नंतर मुद्दल एक रकमी २० हजार रुपये देऊन सुद्धा आणखी व्याजाचे ८०० रुपये बाकी असल्याचा तगादा लावीत दमदाटी करून धमकावत नाहक त्रास देत होता.  

याबाबत रामचंद्र दगडखैरे यांनी मुजोर सावकार नाहीदे विरोधात दंड थोपोटीत सावकारा कडून होत असलेल्या दंडेलशाही व  जाचा बाबत राज्य परिवहनच्या मुंबई मुख्य कार्यालयाच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या वरीष्ठ अधिकार्याकडे तकार केली. नाहीदे यांच्या एस.बी.आय बॅंक व एसटी बॅंकेतील बचत खात्यातून पैशाची देवाण घेवाण केलेल्याची व त्याच्या अवैध मार्गाने मिळविलेल्या संपत्तीची चौकशीच्या मागणी साठी पत्र दिले आहे. या पूर्वीही कल्याण आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी यांनी आगारातील कामगारांना अनधिकृतरित्या व्याजाने पैसे देतात व वारेमाप व्याज वसूल करीत असल्याचे बाबत लेखी तक्रार दाखल केली असून त्या अनुषंगाने ठाणे विभागातील सुरक्षा अधिकारियानी चौकशी करून महात्मा फुले पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम२०१४ नुसार कलम ३९/४५नुसार तक्रार  दाखल केलेली आहे.

सावकार बस वाहक नाहिदे यांच्यावर याआधी १७ लोकांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याचे गंभीर अपराधाची दप्तरी नोंद असून त्याच्यावर आज मिती पर्यत कोणतीच कारवाई झालेली नसून त्याच्या सावकारी धंद्याला परिवहन आगारातील वरिष्ठ अधिकार्याचा आशीर्वाद असल्याची माहिती कामगारांनी दिली. सावकार हरिष नाहीदे च्या सावकारी पाश्याच्या जाचाला कंटाळलेली अनेक कर्मचाऱयांनी त्याच्या विरोधात वरिष्ठ अधिकार्याकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत कल्याण आगारातील सावकाराला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन ठाणे विभाग कार्यालयाचे विभागीय वाह.अधीक्षक यांनी  हरिष नाहीदे याच्या वरील आरोपाला बाबत स्वतंत्र पणे चौकशी सुरू केली असून सादर प्रकरणी चौकशी पूर्ण होई पर्यंत  त्याला सेवेतुन तात्पुरते निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या वाहक व चालकांची सावकाराकडून लूट कल्याण एसटी डेपोतील मुजोर सावकार अखेर निलंबित आर्थिक गर्तेत सापडलेल्या वाहक व चालकांची सावकाराकडून लूट  कल्याण एसटी डेपोतील मुजोर सावकार अखेर निलंबित Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads