Header AD

कल्याण डोंबिवलीत ४१३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


◆ एकूण रुग्ण
 ३,१७२ तर  ७७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५८८ रुग्णांना डिस्चार्ज....

कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४१३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ४१३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,१७२ झाली आहे. यामध्ये ५१४८ रुग्ण उपचार घेत असून ३३,२५१  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४१३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७९कल्याण प  ११४डोंबिवली पूर्व १२१डोंबिवली प- ७६मांडा टिटवाळा १६, मोहना –तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ४१३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ४१३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एक हजार रिक्षांवर पाठींब्याचे पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

कल्याण , कुणाल म्हात्रे   :    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डों...

Post AD

home ads