Header AD

ऑनलाइन वकृत्व स्पर्धेत कार्तिकीचे घवघवीत यश


कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  गरुडझेप यूट्यूब चँनल तर्फे कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळा डुंगे येथील विद्यार्थिनी कार्तिकी ज्ञानेश्वर पाटील हिने सहभागी होऊन द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. कार्तिकीला शिक्षक विलास चौधरी, राजेंद्र पाटील, विनोद निंबाळकर, सावित्रा थोरात, कविता घागस या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. ऑनलाइन स्पर्धा म्हटली की थोडेसे दडपण येतच. परंतु माझ्या शिक्षकांनी व आई-बाबांनी मला संपूर्ण मदत केल्याचे कार्तिकीने सांगितले. डुंगे शाळेचं नाव महाराष्ट्रात  करणाऱ्या कार्तिकीचे गावकरी व शिक्षकांकडून कौतुक होत आहे.

ऑनलाइन वकृत्व स्पर्धेत कार्तिकीचे घवघवीत यश ऑनलाइन वकृत्व स्पर्धेत कार्तिकीचे घवघवीत यश Reviewed by News1 Marathi on September 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads