Header AD

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन


कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  : उपनगरीय लोकल लवकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आज मनसेच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकरी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत या मनसैनिकांना रेल्व स्टेशन प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर मनसे कडून कल्याण रेल्वे स्थानकांबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


सरकारने लवकरात लवकर लोकल सुरू करत जनतेला दिलासा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. ह्या आंदोलनामध्ये माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईरशहर अध्यक्ष कौस्तुभ देसाईमनविसे शहर अध्यक्ष विनोद केणे, शहर सचिव महेश मोरे, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, शहर संघटक रुपेश भोईर आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नेक्स्ट एज्युकेशनचे स्मार्ट लर्निंग अॅप 'लर्ननेक्स्ट+'

  ■विद्यार्थ्यांचे वैयक्तिकृत शिक्षण अधिक मजबूत केले... मुंबई, १ डिसेंबर २०२० :  प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वंकष सेल्फ-लर्निंग अनुभव सुलभ कर...

Post AD

home ads