Header AD

मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय


कल्याण | प्रतिनिधी  :   शुक्रवारी विजेच्या कडकडाटांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे  कल्याण डोंबिवली मनपाच्या मुख्यालया समोरील पार्किंग तसेच महापौर इमारती समोरील परिसर जलमय झाला होता. तसेच कल्याण शहरात देखील या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी पाणी साचले होते.

       सायंकाळी चारच्या सुमारास वीजेच्या गडगडाटासह कोसळलेल्या धुवाधांर पावसाने केडीएमसी मुख्यालया समोरील मेन गेटच्या परिसरातुन रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचे लोंढे तसेच मनपाच्या इमारतीच्या छतावरून पाईप द्वारे खाली येणारे पावसाचे पाणी मुख्यालयातील महापौर इमारत तसेच पार्किंग  परिसरात साचले होते.  अंन्डरग्राँऊन्ड गटारातुन पास न झाल्याने चारी चाकी गाड्याच्या टायर पर्यंत तर दुचाकीचा अर्धा भाग पाण्याखाली गेल्याने केडीएमसी मुख्यालय जलमय झाला होता.  

अवघ्या पाउण तासांच्या अवधीत झालेल्या धुवाधांर पावसाने मुख्यालया बाहेरील पार्किंग परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचून अडंरग्राऊंड गटाराचे पितळ उघडे पडले आहे.  या पावसामुळे कर भरण्यासाठी तसेच आपल्या कामानिमित्त मनपात पार्किंग केलेल्या दुचाकीधारी नागरिकांच्या दुचाकीत पाणी शिरल्याने बंद पडल्या होत्या. महापौर इमारतीसमोर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तळे साचले. यावरून अडंर ग्राऊंड गटाराची सफाई वेळाच्या वेळेस होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे. 

मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads