Header AD

कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत कोरोना योद्धा डॉक्टरांना सन्मानपत्र


डोंबिवली | शंकर जाधव  :  कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर हे देवाप्रमाणे असल्याचे बोलले जात आहे.दिवसरात्र रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्याने आज बरे होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. अश्या डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करणे आवश्यक असल्याने डोंबिवलीत कॉंग्रेसने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.


कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, गटनेते नंदू म्हात्रे,माजी नगरसेवक नवीन सिंग, डोंबिवली पूर्व (बी) ब्लॉक अध्यक्ष नवेंदू पाठारे, डोंबिवली पूर्व (बी) ब्लॉक जनरल सेक्रेटरी अशोक कापडणे, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर, डोंबिवली पूर्व (बी) ब्लॉक अध्यक्ष शशिकांत ( गणेश ) चौधरी,सेवा दल डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष मण्यार समशेर,प्रवीण आठवले, पांडू नाईक, अजय जोशी, पुरुषोत्तम लब्धे, पमेश म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बडेकर यांसह अनेक डॉक्टर्स,परिचारिका,सुरक्षा रक्षक कैलाश पवार,रुग्णवाहिकेचे चालक आणि कोरोना रुग्णांना नेहमी मदत करणारे जितेंद्र आमोणकर यांना सन्मानपत्र देण्यात आले.यावेळी जितेंद्र भोईर म्हणाले,कोरोना रुग्णांच्या जास्तीत जास्त संपर्कात डॉक्टर असल्याने त्यांचे मनोधोर्य वाढवण्यासाठी हा कॉंग्रस पक्षाकडून प्रयत्न आहे.


तर नवेंदू पाठारे म्हणाले, देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. महाराष्ट्रातील ठाणे- कल्याण-डोंबिवली कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.ह्या रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स, प्रशासन आणि सरकार सर्वोतोपरी पप्रयत्न करत आहे. तर शशिकांत ( गणेश ) चौधरी म्हणाले,कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी  म्हणून सर्वात जास्त प्रयत्न करत असले तर ते डॉक्टर्स आहेत.या डॉक्टरांचे कामाबद्दल नागरिक समाधानी आहेत.तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बडेकर म्हणाल्या,पालिका रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. तर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाची सुविधा चांगली आहे.कॉंग्रेस पक्षाकडून डॉक्टरांचा सन्मान झाल्याने डॉक्टरांनाहि प्रोत्साहन मिळाले.

कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत कोरोना योद्धा डॉक्टरांना सन्मानपत्र कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत कोरोना योद्धा डॉक्टरांना सन्मानपत्र Reviewed by News1 Marathi on September 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads