Header AD

डोंबिवलीत खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोऱ्या बाजला भाजप नगरसेविकेची नाराजी


डोंबिवली | शंकर  जाधव  : 
कोरोना काळात सर्व शाळा –महाविद्यालये बंद असल्याने राज्य शासनाने ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु केले. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरु ठेवले. हे शिक्षण घरात बसून मोबाईलचा वापर केला जातो. मात्र यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते.


परंतु अनेक दिवसांपासून डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा परिणाम ऑनलाईन शिक्षणावर होत आहे. ऑनलाईन शिक्षणातील खंडीत वीज पुरवठ्यामुळे उद्भवलेल्या समस्येकडे भाजप नगसेविका मनीषा धात्रक यांनी लक्ष वेधले असून महावितरण कंपनीच्या डोंबिवली विभागाला पत्र देऊन नाराजी व्यक्त  केली. सरकारचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सध्याच्या परिस्थितीत अतिशय  योग्य असला तरी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत धात्रक यांनी  महावितरण कंपनीच्या डोंबिवली विभागाला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले आहे.


२२ मार्च रोजी राज्य सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झाले होते. अश्यावेळी विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये असे सांगत ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला.हा पर्याय  जरी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा असला  तरी यात वीज वितरण कंपनीने सरकारला समाधानकारक साथ दिली नसल्याचे एकूण काही दिवसांच्या परिस्थितीवरून दिसून आले.डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी अनेक तास वीज पुरवठा खंडीत होत होता.


मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरवठा केल्याने डोंबिवलीकरांची ही समस्या सुटली. आता कोरोना काळात घरी बसून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला पुन्हा वारंवार विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर भाजप नगसेविका मनीषा धात्रक यांनी महावितरण कंपनीच्या डोंबिवली विभागाला पत्र देऊन नाराजी व्यक्त केली. वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शिक्षणाच्या नुकसानाला महावितरण कंपनी जबाबदार आहे. यावर लक्ष देऊन शिक्षणाचा विचार करावा असे धात्रक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

डोंबिवलीत खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोऱ्या बाजला भाजप नगरसेविकेची नाराजी डोंबिवलीत खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोऱ्या बाजला भाजप नगरसेविकेची नाराजी Reviewed by News1 Marathi on September 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads