Header AD

लॉकडाऊन काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव
कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :   छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अंबरनाथ, आगरी सेना अंबरनाथ, मी अंबरनाथकर सामाजिक संघटना, शिवबा सरकार व माळी समाज सेवा संघ यांच्या सौजन्याने अंबरनाथ शहर मुंबई, ठाणे, कल्याण व महाराष्ट्रातील covid-19 या महामारीच्या आपत्तीजनक परिस्थितीत आपला कार्यभार सांभाळणारे डॉक्टर, नर्स वैद्यकीय स्टाफ, शासकीय निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.


 कार्यक्रमास स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक उमेश गुंजाळ उपस्थित होते. त्याचप्रमाणे .पो.नि संजय धुमाळ, संजय भेंडे, डॉ. गणेश राठोड, किशोर सोरखाते, आतिश पाटीलनगरसेवक सचिन पाटील, डॉक्टर तुषार बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास आंग्रे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरनाथ शिक्षक सेनेच्या अध्यक्षा डॉ. भारती झोपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा महाजन यांनी केले.
टीम द युवाचे अध्यक्ष योगेश चलवादी यांनी आपल्या मनोगतात सर्व समित्यांचे आभार मानले व आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांविषयी ऋण भावना व्यक्त केली. डॉक्टर गणेश राठोड यांनीआपल्या मनोगतात  अशा या उल्लेखनीय कार्याचा गौरव केल्यामुळे आम्हाला एक वेगळी प्रेरणा आणि आत्मबल व समाज सेवेविषयी आणखीनच प्रोत्साहन मिळाले असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे पाहुणे संजय धुमाळ यांनी कोविड-१९ काळामध्ये घडलेल्या काही  प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले. समाजाकडून तसेच अंबरनाथकरां कडून मिळालेले सहकार्य व योगदान यामुळे आमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन आणखीन कामात उत्साह निर्माण झाला असेही सांगितले.


कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उमेश गुंजाळ यांनी सर्व समित्यांच्या कार्याचा गौरव करून वेळोवेळी समाजकार्यासाठी नेहमी आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन दिले. तसेच आपण केलेले कार्य हे खरोखरच उल्लेखनीय असून तुम्हाला म्हणजे सर्व समित्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा  दिल्या.

लॉकडाऊन काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव लॉकडाऊन काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

Ganesh Deshmukh Saheb Happy Birthday

 

Post AD

home ads