ग्रामीण भागात कोविड टेस्टिंग केंद्र उभारण्याची मनसेची मागणी
कल्याण | प्रतिनिधी : मुंबई ठाण्याप्रमाणेच भिवंडीतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः भिवंडी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत असून ग्रामीण भागात कोरोना टेस्ट नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी ग्रामीण भागात कोरोना टेस्ट सेंटर उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक मदन पाटील, जिल्हा अध्यक्ष, भिवंडी लोकसभा क्षेत्र शैलेश बिडवी, शहर अध्यक्ष मनोज गुळवी, तालुका अध्यक्ष परेश चौधरी आदि पदाधिकारी प्रांत कार्यलायत उपस्थित होते.
ग्रामीण भागात कोविड टेस्टिंग केंद्र उभारण्याची मनसेची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
September 19, 2020
Rating:

Post a Comment