Header AD

कळव्यातील प्रवेशद्वार कमानींची दुरवस्थाकळवा  | अशोक घाग  :  ठाणे महापालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरातील जवळपास सर्वच प्रभागात-विभागांमध्ये प्रवेशद्वार कमानी उभारल्या आहेत. परंतु यातील बहुतांश कमानींची सध्या दूरवस्था असून काही कमानी तर कोसळण्याच्या अवस्थेत धोकादायक स्थितीत आल्या आहेत.  

कळवा प्रभागातील वाघोबा नगर भागात प्रवेश करताना देखील एक कमान महापालिकेच्या खर्चातून बांधण्यात आली आहे. परंतु सध्या ही कमानदेखील दुरवस्थेत आल्याचे दिसून येते. कमानीच्या  दोन्ही बाजूकडील खांबाना रेलूनच इथे दुकाने थाटलेली आहेत. तसेच कमानीवर काही जंगली-पावसाळी झुडुपेही उगवलेली आहेत. या झुडपांमुळे तसेच दोन्ही बाजूच्या दुकानांमुळे या कमानीची रया पुरती गेली आहे. 

ठाणे शहर-जिल्ह्याला ज्यांनी नावलौलिक मिळवून दिला, त्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या मातोश्री निर्मलादेवी दिघे यांचे नाव या कमानीला देण्यात आले आहे. परंतु या महनीय नावाची अक्षरेही उखडली गेली असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या कमानीची तातडीने दुरूस्ती करावी, साफसफाई, रंगरंगोटी करून आजूबाजूचे अडथळे ताबडतोब हटवून ही कमान पुन्हा  आकर्षित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.  
कळव्यातील प्रवेशद्वार कमानींची दुरवस्था कळव्यातील प्रवेशद्वार कमानींची दुरवस्था Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads