Header AD

माणकोली नाक्यावरील उड्डाणपुलाला डॉ.नानासाहेब धर्माधिकारींच्या नावाबाबत लाखो दासभक्तांचे लक्ष!

खासदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याने उड्डाणपूल


भिवंडी  |  प्रतिनिधी   :   ठाणे-भिवंडी बायपासवर वाहतूककोंडीचे मुख्य ठिकाण असलेल्या माणकोली नाक्यावरील वाहतूककोंडी इतिहासजमा होणार असून, भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याने माणकोली नाक्यावर उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पुलाचे सोमवारी ई-लोकार्पण केले जाणार आहे. दरम्यान, या पुलाला महाराष्ट्रभूषण आदरणीय तिर्थरुप डॉ. श्री. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल असे नाव देण्याची खासदार कपिल पाटील यांची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजूर केली होती. मात्र, आता या पुलाच्या नावाबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे लाखो दासभक्तांचे लक्ष लागले आहे.


बायपासवरील माणकोली व रांजणोली येथील उड्डाणपूल उभारण्याबाबत खासदार कपिल पाटील यांच्याकडून एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्याबरोबरच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. या पुलाच्या कंत्राटदाराकडून सुरू असलेल्या संथ कामाबद्दल सातत्याने आवाज उठविला होता. त्यानंतर पुलाची एक मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार २०१७ मध्ये पुलाच्या उजव्या मार्गिकेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यावेळी खासदार कपिल पाटील यांनी पुलाला महाराष्ट्रभूषण आदरणीय तिर्थरुप डॉ. श्री. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारींचे नाव देण्याची मागणी तत्वत: मान्य केली होती.


माणकोली उड्डाणपूलाचे सोमवारी (ता. २१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही मार्गिकांवरुन वाहतूक सुरू होईल. त्यामुळे माणकोली नाक्यावरील वाहतूककोंडी आता इतिहासजमा होणार आहे. ठाणे व रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहे. स्वच्छता, वृक्षारोपण आदींसारख्या कार्यक्रमांतून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून अनेक वर्षांपासून विधायक कार्य केले आहे. त्यांच्या उपक्रमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे. त्यामुळे माणकोली नाक्यावरील पुलाला महाराष्ट्रभूषण आदरणीय तिर्थरुप डॉ. श्री. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल असे नाव दिल्यास त्यांचा सन्मान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवे सरकार फडणवीसांच्या तत्वत: निर्णयाला मान्यता देते का, याकडे लाखो दासभक्तांचे लक्ष लागले आहे.
 

माणकोली नाक्यावरील उड्डाणपुलाला डॉ.नानासाहेब धर्माधिकारींच्या नावाबाबत लाखो दासभक्तांचे लक्ष! माणकोली नाक्यावरील उड्डाणपुलाला डॉ.नानासाहेब धर्माधिकारींच्या नावाबाबत लाखो दासभक्तांचे लक्ष! Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads