Header AD

शिवसेनेने २७ गावात फुट पाडली भूमिपुत्रांनी याचा जाब सरकारला विचारावा आमदार रविंद्र चव्हाण यांचा शिवसेनेवर जाहीर आरोप


 

डोंबिवली  | शंकर जाधव  :  २७ गावे पालिकेत समाविष्ट होऊनही आजतागायत गावांचा विकास झालेला नाही.२७ गावे पालिकेतून वगळावी या भूमिकेवर भाजपचाही पाठिबा होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर या सरकारने २७ गावात फुट पाडली. १८ गावे पालिकेतून वेगळी करून ९ गावे पालिकेच ठेवली.याचा जाब भूमिपुत्रांनी या सरकारला विचारावा असा जाहीर आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. भाजप कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चा कार्यकारणीचा पद नियुक्तीचा कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजीयांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात भाजप कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चा कार्यकारणीचा पद नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे ओबीसी  मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हरीचंद्र भोईर  आणि कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्हा ओबीसी  मोर्चा कार्यकारणीचा पद नियुक्ती कार्यक्रम पार पाडला. 


तसेच  दिव्यांगाना दाखले वाटप करण्यात आलेह्या प्रसंगी काही कांग्रेस  कार्यकर्त्यांचा तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक   हरीचंद्र मुकादम यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी नगरसेवक जालिंदर पाटीलनगरसेविका सुनिता खंडागळेसरचिटणीस रविंद्र पाटीलभरत जाधवउपाध्यक्ष  सुनील म्हसकर किरण पांचाळकिशोर सोरखादेमहिला अध्यक्षा मनिषा राणेश्रीमलंग मंडळ अध्यक्ष राजेंद्र वारेडोंबिवली पूर्व मंडळ उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे, जिल्हा सचिव माधुरी जोशीयुवामोर्चा अध्यक्ष अमित चिकणकरसरचिटणीस मनोज पाटीलउपाध्यक्ष गुरुनाथ पाटीलअविनाश म्हात्रेवार्ड अध्यक्ष संतोष शुक्ला,  ओबीसी मंडळ अध्यक्ष धनाजी पाटीलमहिला वार्ड अध्यक्षा तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी `मुख्यमंत्री हे वर्ष फ्रोम होम`काम करत असल्याचा टोला लगावला.


ते म्हणाले ,महाविकास आघाडी सरकार हे नापास लोकांचे सरकार आहे.ही परिस्थिती शिवसेनेने आणली असून जास्त दिवस हे सरकार राहणार नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस हेमुख्यमंत्री पदावर विराजमान होईल असे सांगितले. तर आमदार रविंद्र चव्हाण यांनी सुरुवातीला पक्षात सामान्य कार्यकर्ता ते आमदार या प्रवासाबद्दल उपस्थितींना थोडक्यात माहिती दिली.ते पुढे म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीससरकार असताना २७ गावात ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. आज या गावातील ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांना रोजगार मिळाला असता.या सरकारने २७ गावात फुट पाडली आहे.तर ओबीसी सेलच्या कार्यकारणीत ज्या सदस्यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी आई कार्यकर्त्यांनी सरकारी योजनांची माहिती जनतेला दिली पाहिजे.

शिवसेनेने २७ गावात फुट पाडली भूमिपुत्रांनी याचा जाब सरकारला विचारावा आमदार रविंद्र चव्हाण यांचा शिवसेनेवर जाहीर आरोप शिवसेनेने २७ गावात फुट पाडली भूमिपुत्रांनी याचा जाब सरकारला विचारावा  आमदार रविंद्र चव्हाण यांचा शिवसेनेवर जाहीर आरोप Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads