Header AD

रुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची तोडफोड


◆ कल्याणातील आयुष  हॉस्पिटलची तोडफोड पोलिसानी मारहाण व तोडफोड करणार्यांना गुन्हे दाखल करीत केली अटक...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  रुग्ण दाखल न केल्याने रुग्णाला दुसरया रुग्णालयात नेईपर्यत रुग्णाचा जीव गेल्याच्या रागातून काही नागरिकांनी कल्याण पश्चिमेतील आयुष रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टर आणि कर्मचार्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्रतीकप्रितेशप्रकाश आंबेकर व अन्य दहा नागरिकांना वर गुन्हे दाखल केला आहे.


कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील आयुष हॉस्पिटल हे कोव्हीडसाठी राखीव असताना या रुग्णालयात एका रुग्णाला उपचारासाठी दाखल न केल्याने उपचाराअभावी रुग्ण मृत्यू पावल्याचा आरोप  संतप्त नातेवाइकांनी केला.  मयत रुग्णाच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत जाब विचारीत डॉक्टर व कर्मचारयांना शिवीगाळ करित हॉस्पिटल मधील वस्तूची तोडफोड केली. तसेच रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन  घेऊन आलेल्या ऑक्सिजन व्हॅनच्या चालकाला ही मारहाण केली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलची तोडाफोड, व मारहाण करणाऱ्यां प्रतीकप्रितेशप्रकाश आंबेकर व अन्य नऊ ते दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

रुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची तोडफोड रुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची तोडफोड Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads