Header AD

वनरुपी क्लिनिकच्या वतीने केडीएमसी पत्रकार कक्षात हँण्ड सॅनिटाइज मशीन


कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी वनरुपी क्लिनिकच्या वतीने कल्याण डोंबिवली तसेच ठाणे परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये हँण्ड सॅनिटाइज मशीन बसविण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची हँण्ड सॅनिटाइज मशीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात आणि इतर विभागात देखील बसविण्यात आल्या.

       वन रुपी क्लिनिकच्यावतीने मुंबई उपनगरमध्ये १९ रेल्वे स्टेशनवर माफक दरात आरोग्य सेवा देण्यात येत असून डोंबिवलीतील पाटीदार भवन आणि सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोविड सेंटरचे व्यवस्थापन देखील करत आहेत. हे करत असतांनाच वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात हँण्ड सॅनिटाइज मशीन देण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात मोठ्या संख्येने पत्रकार तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांची ये जा असते. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हँण्ड सॅनिटाइज मशीन बसवली असून नितीन शिंपी यांनी हि मशीन कार्यान्वित केली आहे.      


वनरुपी क्लिनिकच्या वतीने केडीएमसी पत्रकार कक्षात हँण्ड सॅनिटाइज मशीन वनरुपी क्लिनिकच्या वतीने केडीएमसी पत्रकार कक्षात हँण्ड सॅनिटाइज मशीन Reviewed by News1 Marathi on September 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads