Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजार पार ३७६ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


 

◆ एकूण रुग्ण ४१,१२६ तर ८०६ जणांचा आतापर्यंत मृत्यू  तर २४ तासांत ५३३ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजार पार गेली असून आज नव्या ३७६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ३७६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,१२६ झाली आहे. यामध्ये ४५१० रुग्ण उपचार घेत असून ३५,८१०  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३७६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५४कल्याण प  १०५डोंबिवली पूर्व १०४डोंबिवली प- ७९मांडा टिटवाळा  २६ तर मोहना येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून १० रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून१२ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून१ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजार पार ३७६ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजार पार ३७६ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

  ■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न... कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहच...

Post AD

home ads