Header AD

सिद्धिविनायक हॉस्पिटलची मान्यता रद्द अवाजवी बिले आकारल्याने केडीएमसीची कारवाई


कल्याण  |  
कुणाल म्हात्रे  :  रूग्‍णांकडून अवाजवी बिलं आकारल्या प्रकरणी कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील सिध्‍दीविनायक मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता केडीएमसीने कारवाई करत रद्द केली आहे.    


२० बेडची क्षमता असलेल्या या कोविड रूग्‍णालयात उपचार करण्‍यात आलेल्‍या रूग्‍णांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्‍या बाबतच्‍या तक्रारी महापालिकेस प्राप्‍त झाल्‍यामुळे महापालिकेमार्फत नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या लेखापरिक्षक यांच्याकडून मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी यांच्या सनियंञणात रूग्‍णांना आकारणी करण्‍यात आलेल्‍या बिलांची तपासणी केली असता त्‍यामध्‍ये गंभीर अनियमितता आढळुन आल्‍या आहेत. याप्रकरणी या रूग्‍णालयास दिलेल्‍या कारणे दाखवा नोटीशीला त्‍यांनी खुलासा केलेला नाही.


 या रूग्‍णालयास कारणे दाखवा नोटिशीनुसार रूग्‍णास देण्‍यात आलेल्‍या सर्व बिलबुकाच्‍या स्‍थळप्रती लेखापरिक्षणास सादर करणे बाबत कळविण्‍यात आले होते. तथापि रूग्‍णालयाकडून बिल बुक क्र.1 व 2 उपलब्‍ध करून न दिल्‍यामुळे याप्रकरणा व्‍यतीरिक्‍त इतरही काही रूग्‍णास व महापालिकेस वेगवेगळी बिले दिली असल्‍याची शक्‍यता नाकारता येत नसल्‍यामुळे त्‍याबाबत खातरजमा करता आलेली नाही. या सर्व बाबीं पाहता सदर रूग्‍णालय प्रशासनाने कल्‍याण डोंबिवली शहरातील सर्वसामान्‍य कोविड रूग्‍णांची आर्थिक फसवणुक केल्‍याची सकृत दर्शनी आढळुन आले आहे. तसेच महापालिकेची दिशाभूल व फसवणूक केलेली आहे.


 डिसचार्ज झालेल्‍या सर्व रूग्‍णांची बिले लेखापरिक्षकास उपलब्‍ध करून न दिल्‍यामुळे महापालिकेचे नियञंण जुमानलेले नाहीतसेच सर्वसामान्‍य कोविड रूग्‍णांचे सार्वजनिक व आर्थिक हित जपण्‍यास सदर रूग्‍णालय असमर्थ ठरले असूनरूग्‍णालयाने रूग्‍णाचा व महापालिकेचा विश्‍वास गमावलेला आहेत्‍यामुळे मे. सिध्‍दीविनायक मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटलमुरबाड रोडकल्‍याण (प.) या रूग्‍णालयास कोविड रूग्‍णालय म्‍हणुन घोषित केलेले आदेश रद्द करण्‍यात आले आहेत.


तसेच या रूग्‍णालयाची कडोंमपा द्वारे मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 नुसार देण्यात आलेली रुग्णालय नोंदणी दि. 30 नोव्‍हेंबर 2020 किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रूग्‍णास रक्कम परत करणे व बिल बुक क्र.1 व 2 सादर करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्याचा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, यांनी निर्गमित केला आहे.


सिद्धिविनायक हॉस्पिटलची मान्यता रद्द अवाजवी बिले आकारल्याने केडीएमसीची कारवाई  सिद्धिविनायक हॉस्पिटलची मान्यता रद्द अवाजवी बिले आकारल्याने केडीएमसीची कारवाई  Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads