Header AD

मनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे  (प्रतिनिधी) : -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते तथा सांस्कृतिक विभागाचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष डॉ. ओमकार माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 


गेली 14 वर्षे ते मनसेमध्ये कार्यरत होते. त्यांचे वडील हरी माळी हे मनसेचे ठाणे अध्यक्षही होते. मात्र, मनसेमध्ये महाराष्ट्रभर काम करुनही चांगली संधी देण्याऐवजी बाजूला केले जात असल्याने डॉ. ओमकार माळी यांनी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या व  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने ठाणे शहरात मनसेला मोठा हादरा बसला असून आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शहरी भागात राष्ट्रवादीला बळकटी मिळाली आहे.

मनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश   मनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads