Header AD

कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा


 

कल्याण  | कुणाल म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. लवकरहे हे पाडकाम रेल्वेकडून केले जाणार आहे. या पादचारी पूलासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. रेल्वेचे अप्पर मंडल प्रबंधक अशुतोष गुप्ता यांनी ही माहिती पत्राद्वारे खासदार डॉ. शिंदे यांना कळविली आहे.

लोकग्रामचा पादचारी पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका सुद्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांतर रेल्वेने जुन्या पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कल्याण पूर्व लोकग्राम पादचारी पुलाचे पाडकाम लवकर सुरु होणार आहे.

पूलाच्या कामासाठी लागणाऱ्या प्राकलन रक्कमनकाशा आरेखन आदी कामाकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेने १ कोटी ३२ लाख रुपये खर्च देणे अपेक्षित आहे. पूलाच्या बांधकामाकरीता ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. उर्वरीत ३० कोटी रुपये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून मंजूर केले जाणार आहेत. रेल्वेने आजच्या घडीला केवळ पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पाडकाम संपताच नव्या बांधकामाला लगेच सुरवात करण्यात कोणताही अडथला व विलंब होणार नाही.

सिद्धार्थनगर स्कायवॉक तिकीट खिडकीनजीकच एक प्रसाधनगृह बांधण्याची मागणी वारंवार प्रवासीवर्गांकडून केली जात होती. याची दखल घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेकडून रेल्वे प्रशासनास तातडीचे निर्देश देण्यात आले होतेत्याअनुषंगाने प्रसाधनगृहाच्या कामाला रेल्वेने मंजूरी देऊन काम सुरु देखील करण्यात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून खा. डॉ. शिंदे यांना कळविण्यात आले आहे.

कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा Reviewed by News1 Marathi on September 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads