Header AD

कोरोना परिषदेत `आयुक्त हटाव`ला एकमत तर परिषदेत राजकारण होत असल्याचा शिवसेनेचा आरोप


◆  लॉकडाऊनला सर्व संघटना आणि पत्रकार संघटनेचा विरोध...

डोंबिवली | शंकर  जाधव :-  कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळवणार यासाठी सूचना मागवण्यासाठी डोंबिवलीतील पी.पी. चेंबर येथील सर्वोदय सभागृहात पहिली कोरोना परिषद भरविण्यात आली. या परिषदेत आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रमोद ( राजू ) पाटील आणि उपस्थित विविध संस्थाच्या पदाधिकार्यांनी आयुक्त हटाव`ला एकमत झाले. मात्र  डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी परिषदेत राजकारण होत असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला.तर पुन्हा लॉकडाऊन करायचे का यावर सर्व संघटना आणि पत्रकार संघटनेचा विरोध केला.त्यामुळे पहिली कोरोना परिषदे चांगलीच गाजल्याचे दिसून आले.


संपूर्ण ठाणे जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  लाल बावटा रिक्षा चालक –मालक संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी कोरोना परिषद भरविली. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रमोद ( राजू ) पाटील,काळू कोमास्कर, मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, इरफान शेख, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे,नगरसेवक नितीन पाटील,नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष बाबा रामटेके,डोंबिवली पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव,रिपब्लिक सेनेचे आनंद नवसागरे,सामाजिक संघटनेचे आमित दुखंडे, सतीश गायकवाड यासह अनिचे पदाधिकारी, प्रेगेस्ट अगेंस्ट ऑटोवाला संघटनेच अध्यक्ष सचिन गवळी, महेश निंबाळकर आदी आधीसह विविध सामाजिक संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांन श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी काही सूचनांवर चर्चा करताना `आयुक्त हटाव` अशी मागणी करण्यात आली. 


परिषदेच्या वतीने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिका हद्दीत १४ दिवसांत आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करावी आणि कोरोना नियंत्रणात आणावी अन्यथा आयुक्तांची बदली करा असा प्रस्ताव प्रशासनाला देण्यात असल्याचे ठरले.खाजगी कोविड-१९ रुग्णालयात कोरोना रुग्ण व्हेटीलेटरवर १० दिवस असल्यास २ लाखापेक्षा रुपयांपेक्षा जास्त बिल आकारल्यास त्यावर गुन्हे दाखल करा असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी आयुक्तांना कोविड रुग्णालय उभारण्याचा आजार जडला असून याचा बाजार होत असल्याचा जाहीर आरोप केला.यानंतर डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी  कोरोना परिषदेत राजकारण होत असल्याचे पत्रकारांना सांगितले.मोरे म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त बदली हा मार्ग नाही तर आरोग्य यंत्रणा, नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.आयुक्तांचे काम चांगले असून आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या परिषदेत जे राजकारण झाले ते योग्य नसून या परिषदेत अन्य मार्गावर व सुचनावरही चर्चा झाली असती.


प्रस्तावातील महत्वाचे मुद्दे ...

दर आठवड्याला प्रभाग समितीची आढावा बैठक घ्यावी. प्रत्येक प्रभागात दोन मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात.प्रत्येक प्रभागात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करावी.कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करणे.कोविड-१९ रुग्णालयामधील बेड, व्हेटीलेटर किती खाली आहेत याची माहिती नागरिकांना देणे.कोरोना रुग्णाला मानसोपचार तज्ञाची मार्गदर्शन मिळावे.सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे२. कोरोना बाबत जनतेमध्ये गोंधळ असल्याने त्यासाठी प्रभावीपणे आणि व्यापक जनजागृती करणे असे काही मुद्दे कोरीना परिषदेतील प्रस्तावात नमूद करणे..

कोरोना परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवण्याची मागणी..

कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी पुढील कोरोना परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवावे अशी मागणी आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. पालकमंत्री आले तर आयुक्त आणि अधिकारी वर्ग परिषदेत उपस्थित राहतील आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न त्यांच्या समोर ठेवण्यात येतील असे आमदार चव्हाण यांनी सुचविले.

कोरोना परिषदेत `आयुक्त हटाव`ला एकमत तर परिषदेत राजकारण होत असल्याचा शिवसेनेचा आरोप कोरोना परिषदेत `आयुक्त हटाव`ला एकमत तर परिषदेत राजकारण होत असल्याचा शिवसेनेचा आरोप Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads