Header AD

सुराज कुटे यांच्या 'सिनटीला' ची विश्वस्तरावरील पुरस्कारावर मोहर


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण मधील लेखक व दिग्दर्शक सुराज कुटे यांच्या 'सिनटीला'  या शॉर्ट फिल्मला एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'बेस्ट आर्ट फिल्म' अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. या फेस्टिवलचं स्क्रिनिंग जर्मनी मधील बर्लिन शहरातील मॅक्सिम गॉर्की थिएटर येथे नुकतचं पार पडलं आहे. फेस्टिवलचे अध्यक्ष अकिहिरो कावासाकी (जपान) हे असून, फेस्टिवल संचालक इम्रान घोरबानी (इराण) व सुप्रतिक गांगुली (भारत) हे आहेत.

ब्लाइंड कार्ड्स एंटरटेनमेंट प्रस्तुत 'सिनटीलाया शॉर्ट फिल्मची निर्मितीलिखाणदिग्दर्शनएडिटिंगसिनेमॅटोग्राफीआर्ट आणि साऊंड डिजायनिंग हे सर्व सुराज कुटे यांनीच केले आहे. सिनटिला या शाँर्टफिल्म मध्ये कोणत्याही प्रकारचं मानवी पात्र नसूनयात कोणताही संवाद किंवा संगीत नाही. अशा या वैशिष्टयपूर्ण साठ सेकंदाच्या शॉर्ट फिल्म मध्ये फक्त साऊंड डिजायनिंग आणि चित्रभाषेच्या माध्यमातून कलात्मकतेने व्यापक प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न युवा लेखक आणि दिग्दर्शक सुराज कुटे यांनी केला आहे. या आगळ्या वेगळ्या कलाकृतीला अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये पारितोषिकं मिळत असूनसध्या जगभरात या फिल्मचं कौतुक होत आहे.

"जीवनाच्या अस्थिर पटावर जगत असतांनासंकटाच्या प्रसंगी न डगमगताआहे त्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करावा. तसेच सकारात्मक ध्येय धोरण ठेऊन संघर्षमय जीवनाला सदोदित स्वउर्जित प्रेरणेने तेवत स्थिरचित्त करावे" असा व्यापक संदेश लेखक व दिग्दर्शक सुराज कुटे यांनी आपल्या या कलाकृतीतून दिला आहे.

सुराज कुटे यांच्या 'सिनटीला' ची विश्वस्तरावरील पुरस्कारावर मोहर सुराज कुटे यांच्या 'सिनटीला' ची विश्वस्तरावरील पुरस्कारावर मोहर Reviewed by News1 Marathi on September 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

Ganesh Deshmukh Saheb Happy Birthday

 

Post AD

home ads